Lokmat News | PNB बँकेने Nirav Modi भोवती आवळले फास | 9 लक्झरी Car जप्त | Lokmat Marathi News

2021-09-13 0

देशाचा पैसा घेऊन पळालेल्या नीरव मोदीच्या ९ लक्झरी कार ईडीनं जप्त केल्या आहेत. याचबरोबर नीरव मोदीचे म्युचुअल फंड आणि शेअरही जप्त करण्यात आले आहेत. ईडीची छापेमारी अजूनही सुरुच आहे. नीरव मोदीच्या ज्या कार जप्त करण्यात आल्या आहेत त्या सगळ्या लक्झरी कार आहेत. यामध्ये एक रोल्स रॉईस घोस्ट, २ मर्सिडिज बेंज GL 350 CDI, पोर्शे पनामेरा, ३ होंडा कार, एक टोयोटा आणि एक टोयोटा इनोव्हा या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.सीबीआयनं अलिबाग मधलं नीरव मोदीचं फार्म हाऊसही सील केलं आहे. हे फार्म हाऊस १.५ एकरमध्ये पसरलं आहे. या फार्म हाऊसमध्ये रोपन्या नावाचा बंगलाही आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews